About Us

About Us

इंटरपिडीयन्स ही कंपनी २०१७ साली, विजय नाग आणि भानुदास साटम या दोघांनी मिळुन चालु केली. जरी कंपनी २०१७ साली स्थापन झाली तरी त्यापुर्वी आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलमेंट, वेबपेज डिझाईन, या प्रकारच्या सेवा आणि आय.टी. क्षेत्रातले ट्रेनिंग गेली १५ वर्षे देत आहोत. आम्हाला साधारणतः २५ वर्षाचा कॉम्युटर सायन्स हा क्षेत्रातील अनुभव आहे. ट्रेनिंग, कोचिंग, आणि कन्सलटन्सी हे  गेली अनेक वर्ष आम्ही करीत आहेत. आतापर्यंत अनेक समाधानी ग्राहक कंपनीची सेवा घेत आहेत. त्यामध्ये सरकारी एजन्सी आणि खाजगी संस्था देखील आहेत.

मिशन

आम्ही आता नव्याने गेली दोन वर्ष २०१८ पासुन टेक्निकल शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत त्याच्या भाषेत पोहचविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीकोनातुन प्रयत्न ही करत आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे वेबीनार द्वारे किंवा सेमीनार द्वारे भारतीय भाषेत हे ज्ञान लोकांपर्यंत पोहचवत आहोत. ते ही लोकांना परवडेल अशा फी मध्ये. २५ वर्षाचा प्रवास आणि अनुभव गाठीशी आहे. अनेक स्थित्यंतरे आम्ही पाहिलेली आहेत. १९९० मध्ये आलेल्या आयटीच्या म्हणजे इंडस्टी ३.० चे आम्ही साक्षीदार आहोत. आणि आता उंबरठ्यावर येऊन पोहचलेल्या इंडस्टी ४.० साठी आम्ही तयार आहोत आणि इतरांना तयार करणार आहोत. प्रत्येकाला आधुनिक ज्ञान घेण्याचा हक्क आहे. पैस नाहीत किंवा पैसे जास्त आहेत म्हणुन शिकता येत नाही. त्या सर्वसामान्यांसाठी माफक फी मध्ये कोर्सेस आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.